Friday, 6 May 2016

बलात्कारी प्रियकराला एका पिडीतेच पत्र ...


एका प्रियकराकडुनच झालेल्या बलात्कार पिडीतेने विचारलेला जाब....



माझ्या बलात्कारी प्रियकराला पत्र...

हॅलो,
आठवल मी कोण आहे? कारण मी खात्रीपुर्वक तुला विसरू शकत नाही. आपल्याला भेटून फक्त 6 च आठवडे झाले होते तेव्हा. पण तेव्हापासून आजतोवर मी तुझ्या त्या दिलेल्या आठवनींच्या यातनांची शिक्षा भोगते आहे. तू तर कधी विचार पण केला नसशिल इतकी तुझी ती गुन्हेगारी मला आतून पोखरत आहे. मार्च 5, 2015 (हो मला ती तारीख चांगली आठवनीत आहे.) तू माझ्यावर बलात्कार केलास. मी किती विनवणी केली होती तुला, 'नको रे, नको. सोड मला.' Please stop it. पण तू माझी एक ऐकली नाहीस. मी कधीच असा विचार केला नव्हता माझी पहिली वेळ कशी राहील. नी असा तर मुळीच नाही की पहील्याच वेळी माझ्यावर बलात्कार होईल.
मी एक नाजूक पोर होते रे. तू माझी एक ऐकली नाहीस. नी माझ्या निरागस शरीरावर वार करत राहीलास. मी किती मुर्ख होते. तुला किती चांगला समजत होते. माझ्या मैत्रीनींनी पण मला तुझ्यापासुन दूर रहायला सांगितले होते. पण मी त्यांची एक ऐकली नाही. तू माझ्या मनात बसला होतास. पण तू पण इतरांसारखाच निघालास.   You stole my virginity. नी त्या दिवसापासुन मला मी स्वतःलाच हीन वाटू लागली. मी माझ कौमार्य तुला दिल नव्हतं. तू ते हिसकावल. तुला फक्त माझ शरीर पाहिजे होत. माझ मन नाही. का? का तुम्ही मूल आम्हा मुलींच्या मनाची कदर करत नाहीत? का तू तुझी बळजबरी थांबवली नाहीस? तुझ्या मित्रांन्नी काय तुला शाबासकी  दिलि जेव्हा तु त्यांना सांगीतलस की तू माझ्यासोबत प्रणय केलास? प्रणय नव्हे तो बलात्कार केलास? काय पुरुशार्थ वाटला तुला त्या जबरदस्तीत?
आज 8 महिने झाले मी हे ओझे मनावर घेवुन शांत आहे. पण आता त्या त्या दिवसाच्या यातना सहन होत नाहीत. मी का त्या कलंकाच ओझ घेऊ? मी त्या पापाची गुन्हेगार नाहीय. त्या गुन्ह्याचा गुन्हेगार तू आहेस. तो तू होता ज्याच्यामुळे मी आजही जगण्यासाठी झुंजते आहे. तो त आहेस ज्याच्यामुळे मला या हॉस्पीतळाच्या खाटेवर पडून तू केलेल्या नुकसानीची सजा भोगावी लागत आहे. मला या दुःखाच्या खाईत लोटनारा तू आहेस. या वेदनांचा हक्कदार तू आहेस. तुला हे ऐकाव लागेल. ' प्रियकरानेच प्रियसीचा बलात्कार केला' हे तुला मान्य कराव लागेल. You sencerily have to be sorry for raping me. तुला हे ओझ घ्याव लागेल. आजवर तू ते माझ्यावर लेटुन पळत राहीलास. आता तुला पण तू केलेल पाप घेऊन जगाव लागेल.
शेवटी मी फक्त एकच इच्छा करू शकते की तू परत कुणा दुसऱ्या मुलीला या खाईत ओढणार नाहीस.


तुझ्या बलात्काराची पिडीत.

No comments:

Post a Comment

                            घोडेबाजार  त्या अलिशान हाॅटेलाच्या संडासात लपवलेला फोन स्विच ऑन करताच थरथर करून वाजला. हाय, हॅलो ची औपचारिकता न ...