बुद्ध आणि अहिंसा
तथागत बुद्धांना नेहमी अहिंसे शी जुडले जाते पण त्यांची अहिंसा म्हणजे नेमकी कोणती? तथागतांना अहिंसा म्हणजे नेमकं काय अपेक्षित होत?
बुद्ध हे हिंसेच्या विरोधात होते. परंतु त्याच वेळेस ते न्यायाच्या बाजूने पण होते आणि त्यांनी न्यायाकरिता आवश्यक असेल तर बळाच्या वापराची अनुमती दिली. हि बाब त्याच्या वैशालीच्या सेनाप्रमुख सिह सेनापती यांचेशी झालेल्या संवादातून अधिकच स्पष्ट होते.
सिह सेनापतींना जेव्हा कळले कि बुद्ध हे अहिंसेचा उपदेश देत आहेत, तेव्हा तो बुद्धाकडे गेला आणि म्हणाला : "भगवान बुद्ध हे अहिंसेची शिकवण देतात, काय भगवान अपराध्याला शिक्षेपासून मुक्तता देण्याची शिकवण देतात काय? काय भगवान असे शिकवतात कि आम्ही आमच्या पत्नी, आमची संताने, आमची संपत्ती यांचे संरक्षण करन्याकरता देखील युद्ध करू नये? अहिंसेच्या नावाखाली काय अत्याचार्यांकडून आम्ही त्रस्त व्हावे? काय तथागत सर्व प्रकारचे युद्ध मग ते सत्य आणि न्याय कारणासाठी असले तरी निषाद मानतात काय? "
बुद्ध म्हणाले : "मी जे काही शिकवतो आहे, त्याविषयी तुम्ही गैरसमज करून घेतला आहे. अपराध्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि निर्दोश व्यक्तीला स्वतंत्र मिळालेच पाहिजे. जेव्हा न्यायाधीश हा गुन्हेगाराला शिक्षा देतो तेव्हा त्यात त्याची काही चूक नसते. शिक्षेला कारणीभूत गुन्हेगाराचा अपराध असतो.जो न्यायाधीश अपराध्याला दंडित करतो तो फक्त कायद्याचे पालन करत असतो. त्याने अहिंसा पाळली नाही असा ठपका त्याच्यावर ठेवता येणार नाही. अशी व्यक्ती जी न्यायाकरता आणि सुरक्षितताकारता लढते तिला अहिंसे विषयी दोषी धरले जाऊ शकत नाही. जर शांतता प्रस्तापित करण्याचे सर्व मार्ग असफल झाले तर हिंसेची जबाबदारी त्याच्यावर येते ज्याने युद्ध सुरु केले आहे. दुष्ट शक्तीपुढे कधीही शरणागती पत्करता कामा नये. तिथे युद्ध होऊ शकेल. परंतु ते युद्ध स्वार्थी हेतू करीत नसावे..."
(Dr. Babasaheb Ambedkar : writtings and speeches )