Thursday, 28 July 2016

प्रबोधनकार ठाकरेंच्या लेखणीतुन

बौद्ध तत्त्वज्ञानाचा अमीट ठसा....

प्रबोधनकार ठाकरे :-

"हिंदूधर्मात स्वत:चे म्हणावे असे महान, उच्च, उदात्त काहीही नाही.
जे उच्च-उदात्त दाखविले जाते ते प्रत्यक्षात मुख्यत: बौद्धांचे आणि अंशत: अन्य प्रवाहांचे आहे.
आज निसर्गाशी संबंधित अनेक सणवार आपण साजरे करतो, त्यापैकी जवळपास सगळे सण बौद्ध परंपरेतून आलेले आहेत. अनेक अर्थपूर्ण प्रतिकंही याच संस्कृतीने समाजमनात रुजविलेली आहेत. खरेतर बौद्ध धर्म हाच भारतीय मातीतला पहिला आणि खरा मानवधर्म होय ! हाच धर्म भारतीय संस्कृतीवरचा आद्य आणि सखोल ठसा आहे !"
बौद्धधर्माचे चेहरे तरी किती लपवणार? ज्या पुरी, शंृगेरी, बद्रीनाथ, द्वारका या ठिकाणी शंकराचार्यानी चार हिंदूधर्मपीठे स्थापन केली, ती ठिकाणे मूळची बौद्ध चळवळीचीच महान केंद्रेहोती ! पुरीचे जगन्नाथाचे मंदिर हे पूर्वीचे बौद्धमंदिर होते ! (इति. स्वामीविवेकानंद!) शंृगेरीचा शंकराचार्याचा मठच बौद्धस्तुपाच्या जागेवर झालेलाआहे ! श्रीशैलमचे मंदिरही पूर्वीचे बौद्धशिल्प होते ! तिरुपतीचा बालाजी, बद्रीनाथचा बद्रीकेदारेश्वर ही सध्या हिंदूंची म्हणवली जाणारी धार्मिकक्षेत्रे पूर्वीची बौद्धधर्माची महत्त्वाची स्थाने होती. (तिरुपती बालाजीआणि तिथला परिसर नीट न्याहाळला तरी हे लक्षात येते! मुंडन पद्धत ही मूळचीबौद्धपरंपरेची!)
बौद्ध धर्माची जी चार प्रमुख सेंटर्स होती त्या ठिकाणी चारधाम यात्रा बौद्ध मंडळींनी सुरू केली. या चार धामांचे यथावकाश अपहरणकरण्यात आले. देशातल्या बहुतांश देवदेवता, त्यांच्या मूर्ती आणि मंदिरेमूळची बौद्धांचीच आहेत. 🌱अगदी कोल्हापूरची महालक्ष्मीची मूर्तीही आणि तिचे मंदिरही !🌱   (गरज इथे आहे!) अशी असंख्य ठिकाणे हिंदू-वैदिकसंस्कृतीने हडप केली आणि तिथे ‘..अशी आख्यायिका आहे..’ टाइप पौराणिककथांचा व वैदिक कर्मकांडांचा बाजार मांडला !

🌞⛄️बौद्धधर्म सबंध भारतभर व भारताबाहेर विस्तारला होताच, परंतु महाराष्ट्राच्या अणूरेणूत तो अक्षरश: भिनला होता. लोकसेवेच्या, समतेच्या, ज्ञानविज्ञानाच्या चळवळी महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातून आणि डोंगरपर्वतातून निनादल्या होत्या ! यातूनच महाराष्ट्राचे परमवैभव असलेली बौद्ध लेणी निर्माण झाली आणि महाराष्ट्राच्या भूगोलावर बौद्ध इतिहासाच्या सर्जनशीलतेचा अप्रतिम ठसा कायमचा कोरला गेला ! नंतरच्या काळात या लेण्यांबाहेर कुठल्यातरी चमत्कृतीपूर्ण शिवाची, देवाची किंवा देवीची उभारणी करून बौद्धलेण्यांना हायजॅक करण्यात आले ! त्यासाठी काल्पनिक देवदेवतांच्या सुरस कहाण्यांना ऊत आणला गेला !
प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, "फारदूर नको, लोणावळ्याजवळची कार्ला लेणी पहा ! ही वास्तविक बौद्धांची ! तेथल्या त्या ओटय़ा, ते दिवाणखाने, ते स्तूप, साऱ्या बौद्धांच्या स्वाध्यायश्रमाच्या जागा ! तेथे बाहेर एक देवी अचानक प्रगट झाली ! तिचे नावएकविरा ! हिला वेहेरीची देवी असेही म्हणतात. ही पांडवांची बहीण. हिच्यासाठी भीमाने एका रात्रीत ही लेणी कोरून काढली !"
किती उदाहरणे सांगायची ?
🌲आजशाळा-कॉलेजांमधून आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. परंतु हा ‘गुरू’ कोण हे कुणाला माहीत नाही !
हा गुरू आहे, गौतम बुद्ध!  त्याने पाच शिष्यांना केलेल्या पहिल्या उपदेशामुळे पहिली गुरुपौर्णिमा साजरी झाली आणि तिथून तो पायंडा पडला ! (पण आज गुरुपौर्णिमा बिनबोभाटपणे व्यासमहाशयांच्या नांवावर खपविली जातेय !)

मंगळसूत्र, मंगलाष्टका असे अगणित शब्द बौद्धपरंपरेतूनच आलेले आहेत. थोडक्यात, आपल्या लोकसंस्कृतीवर असलेला बौद्धधर्माचा, बौद्ध प्रतिकांचा, बौद्धविचारतत्त्वांचा ठसाच इतका अमीट आहे की, त्यापासून बाजूला होऊ म्हटले तरी होता येत नाही, अशी परिस्थिती आहे.
भारताच्या राष्ट्रध्वजावरचे अशोकचक्र हे बौद्धधम्मचक्रप्रवर्तनाचेच प्रतिक आहे ! भारताची अधिकृत शासकीय राजमुद्रा ही बौद्धपरंपरेचीच खूण आहे. राष्ट्रपतीभवनात राष्ट्रपतीच्या आसनामागे दर्शनी जागी ठळक अक्षरात ‘धर्मचक्रप्रवर्तनाय’ असे कोरलेले आहे.

Wednesday, 6 July 2016

शिक्षणाच्या आईचा घो

:-( मुलगा शिकुन इंजिनिअर झाला.  पुण्याला मोठ्या नामांकीत कंपणीत साहेब झाला. पगार महिना 32000 रु.
मुलासाठी चांगली सुशिक्षित, सुस्क्रुत, सुंदर मुलगी पाहीजे. मुलगा इंजिनीअर मग मुलगी पण इंजीनिअर असेल तर उत्तम.

आता बर ठीक आहे. तुमच्या मुलाला तुमच्या अटींप्रमाणे सुशिक्षित, सुस्क्रुत, सुंदर आणि इंजीनिअरच मुलगी मिळाली. लग्न झाल, सर्व पार पडल. मग आता मध्येच का तुमच घोड मेल? लग्नासाठी तुम्हाला इंजिनीअर मुलगी हवी होती मग आता लग्नानंतर तुमचे विचार कसे बदलले? तिने आता तिची नोकरी continue करण्याची इच्छा केली तर चक्क तुम्ही तिला विरोध करता. घराला स्त्रीच्या कमाईची गरज नाही , मुलाची मिलकत पुरते वगैरे टोमणे मारायला सुरुवात झाली? तुम्हाला जर घरकाम करणारी मोलकरीणच हवी होती तर इंजिनिअर मुलगी का बघितली? घरकाम करायला कमी शिक्षण घेतलेल्या पण घरकामात तरबेज असलेल्या खूप मुली आहेत समाजात. एखादीच नशीब उजळल असत. मुलींनी नोकरी करण तुम्हाला खपत नाही मग का असा उच्च शिक्शित वधु चा अट्टाहास का करता? तुमच्या या पुरुशी हेकेखोरपणामुळे त्या मुलीच्याच नव्हे तर तिच्या बापाच्या मनाला किती दुःख झाल असेल याचा विचार केला कधी? किती स्वप्न बघून त्या बापड्यान आपल्या मुलीला इंजिनिअर बनवलेल असत. कशासाठी? लग्नानंतर तुमच्या घरकामगार होण्यासाठी?

समाजातला पुरुशी हेकेखोरपणा कधी जाईल कोण जाणे. अजून किती मुलींच शिक्षण धुळीला लागणार आहे कोण जाणे. अश्या वेळी खरच म्हणावस वाटत," या शिक्षणाच्या आईचा घो."

(मुलींनो स्पष्ट नकार द्या अश्या स्थळाला जिथे तुमच्या शिक्षणाची कदर नाही.)

                            घोडेबाजार  त्या अलिशान हाॅटेलाच्या संडासात लपवलेला फोन स्विच ऑन करताच थरथर करून वाजला. हाय, हॅलो ची औपचारिकता न ...