बौद्ध धर्माच्या र्हासाची सुरुवात…
बौद्ध धर्म खऱ्या अर्थाने सम्राट अशोकाच्या काळात सर्व भारतात पसरला. अशोक गादीवर आला तेव्हा त्याने मौर्य साम्राज्याचा विस्तार केला. त्याने त्याच्या राज्यात बुद्ध विचारांचा पाया बसवला. त्यामुळे ब्राम्हणशाहीला फार मोठा धक्का बसला.
अशोकाच्या काळात ब्राम्हणांकडे दुर्लक्ष केले गेले. त्यांना समाजात दुय्यम स्थान मिळाले. ब्राम्हण धर्म विधीतील महत्वाचा घटक असलेल्या सर्व प्रकारच्या पशुबळीस अशोकाने बंदी घातली. त्यामुळे ब्राम्हण निश्प्रभ झाले. ब्राम्हण केवळ राजाश्रयच गमावुन बसले नाहीत तर त्याचा जो होम करण्याचा मूळ व्यावसायच बंद पडला. त्या होमासाठी ते भरमसाट पैसे घेत असत व त्यावर चरीतार्थ चालवत असत. त्यामुळे मौर्य साम्राज्याचा र्हास होईपर्यंत सुमारे 140 वर्ष ब्राम्हण हे समाजातील दुय्यम घटक बनले होते. या बौद्ध धर्माच्या राज्याविरुद्ध बंद करणे हा एकमेव मार्ग त्यांना राहिला होता. त्यामुळे पुश्यमित्र च्या नेत्रुत्वाखाली मौर्य साम्राज्याविरुद्ध बंडाचे निशाण फडकावले गेले.
बौद्ध धम्म नाहीसा करून ब्राम्हणशाही बसवणे हा एकमेव उद्देश पुश्यमित्राने ठेवला.
शेवटचा मौर्य सम्राट अशोकाचा वंशज ब्रुहद्रथ मौर्याची कपटपुर्वक हत्या करुन पुश्यमित्र जेव्हा गादीवर आला तेव्हा त्याने वैदिक पद्धतीप्रमाणे अश्वमेध यङ्य केला की ज्यामुळे सार्वभौम सत्ता स्थापन करणे शक्य होते.
बौद्ध धर्माचे खास वैशिष्ट्य पशुंच्या जीवनाबद्दल कमालीचा आदर होय. अशोकाचा पशु हत्या बंदी कायदा मोडून पुश्यमित्राने अश्वमेध करून पशुबळीस सुरुवात केली. आणि नंतर सुमारे 500 वर्ष हे पशुबळी होम चालू राहीले.
त्याचबरोबर पुश्यमित्राने बौद्ध भिक्खुंचा अमानुश छळ सुरु केला. जे बौद्ध धर्माचा प्रसार करतील अश्या भिक्खुंच्या कत्तली केल्या जिवाच्या आकांताने बौद्ध भिक्खुंनां भारत सोडून शेजारील देशात पलायन करावे लागले. तिथेच बौद्ध धम्माच्या र्हासाची सुरुवात झाली.
No comments:
Post a Comment