Saturday, 21 May 2016

मनुस्मृति : अपराध और दंड

मनुस्मृति : अपराध और दंड

कार्षापणं भवेद्दण्ड्यो त्रान्यः प्रकृतो जनः।
तत्र राजा भवेद्दण्ड्यः सहस्रमिति धारणा।।
(मनु0, 8-335)
भावार्थ – साधारण प्रजा को जिस अपराध के लिए एक पैसा दंड दिया जाता है, उसी अपराध में लिप्त होने पर राजा पर हजार पैसा दंड लगाया जाना चाहिए।


अष्टापद्यं तु शुद्रस्य स्तेये भवति किल्विषम्।
षौडशैस्तु वैश्यस्य द्वात्रिंशत्क्षत्रियस्य च।।
(मनु0, 8-236)
     भावार्थ- यदि चोरी शुद्र, वैश्य या क्षत्रिय करता है तो उन्हें पाप का क्रमशः आठ, सोलह और बत्तीस गुना भागीदार बनना पड़ता है।


उभावपि तु तावेव ब्राह्मण्या गुप्तया सह।
विलुप्तौ शुद्रवद्दण्ड्यौ दग्ध्व्यौ वा कटाग्निना।।
(मनु0, 8-376)
भावार्थ – यदि रक्षिण ब्राह्मणी से वैश्य या क्षत्रिय शारीरिक संबंध स्थापित करे तो उन्हें शुद्र के समान दंड देते हुए आग में जलाकर मार देना चाहिए।


सहस्रं ब्राह्मणो दण्ड्योगुप्तां विप्रां बलाद् व्रजन्।
शतानि पत्र्च दण्ड्यः स्यादिच्छन्त्या सह सड्.गतः।।
(मनु0, 8-377)
भावार्थ – रक्षित ब्राह्मणी से यदि ब्राह्मण बलात मैथुन करता है तो उस पर दो हजार पैसा दंड लगाना चाहिए। यदि ब्राह्मणी की सहमति से ऐसा करता है तो उसे पांच सौ पैसा दंड देना चाहिए।


मौण्ड्यं प्राणान्तिकोदण्डोब्राह्मणस्य विधीन्यते।
इतरेषां तु वर्णानां दण्डः प्राणान्तिको भवेत्।।
(मनु0, 8-378)
भावार्थ – ब्राह्मण के सिर मुंडवाने का अर्थ ही उसको मृत्युदंड देना है, जबकि अन्य वर्णवालों को मृत्युदंड मिलने पर उनका सचमुच वध किया जाना चाहिए।
न जातु ब्राह्मणं हन्यात्सर्वपापेष्वपि स्थितम्।
राष्ट्रादेनं बहिः कुर्यात्समग्रधनमक्षतम्।।
(मनु0, 8-379)
भावार्थ- भले ही ब्राह्मण ने अनेक महापाप किए हों, किंतु उसका वध करना निषिद्ध है। उसे देश निकाले की सजा दी जा सकती है, ऐसी स्थिति में उसका धन उसे दे देना उचित है।


न ब्राह्मणवधाद्भूयानधर्मा विद्यते भुवि।
तस्मादस्य वधं राजा मनसापि न चिन्तयेत्।।
(मनु0, 8-380)
भावार्थ- ब्राह्मण के वध से बढ़कर और कोई पाप नहीं। ब्राह्मण का वध करने की तो राजा को कल्पना भी नहीं करना चाहिए।


शतं ब्राह्मणमाक्रुश्य क्षत्रियो दण्डमर्हति।
वैश्योऽप्यर्धशतं द्वे वा शुद्रस्तुवधमर्हति।।
(मनु0, 8-266)
भावार्थ- ब्राह्मण को यदि क्षत्रिय, वैश्य या शुद्र द्वारा अपशब्द या कठोर वचन कहा जाए तो उन्हें क्रमशः सौ पैसा, डेड़ सौ पैसा तथा वध का दंड देना चाहिए।


पत्र्चाशद् ब्राह्मणो दण्डः क्षत्रियस्याभिशंसने।
वैश्ये स्यादर्धपत्र्चाशच्छूद्रे द्वादशको दम्ः।।
(मनु0, 8-267)
भावार्थ- यदि ब्राह्मण द्वारा क्षत्रिय, वैश्य या शुद्र को अपशब्द कहा जाए तो उसे क्रमशः पचास, पच्चीस और बारह पैसा आर्थिक दंड देना चाहिए।


एकाजातिद्र्विजातीस्तु वाचा दारूण या क्षिपन्।
जिह्नयाः प्राप्नुयाच्छेदं जघन्यप्रभवो हि सः।।
(मनु0, 8-269)
भावार्थ – शुद्र द्वारा द्विजातियों को अपशब्द कहा जाए तो उसकी जिह्ना काट लेनी चाहिए, ऐसे अधम के लिए यही दंड उचित है।


नामजातिग्रहं त्वेषामभिद्रोहेण कुर्वतः।
निक्षेप्योऽयोमयः ‘ांकुज्र्वलन्नास्ये दशांगुलः ।।
(मनु0, 8-270)
भावार्थ – यदि शुद्र प्रभाव के अहंकार में द्विजातियों के नाम व जाति का उपहास करता है तो आग में तप्त दस उंगली शलाका (लोहे की छड़) उसके मुंह में डाल देनी चाहिए।


धर्मोपदेशं दर्पेण विप्राणामस्य कुर्वतः।
तप्तमासेचयेत्तैलं वक्तृ श्रोत्रे च पार्थिवः ।।
(मनु0, 8-271)
    भावार्थ- यादि शुद्र दर्प में आकर द्विजातियों को धर्मोपदेश दे तो राजा उसके मुंह व कान में खौलता तेल डलवा दे

Sunday, 15 May 2016

मनुस्म्रूती : ब्राम्हणशाहीचा अनैतीक कायदा...

मनुस्म्रूती : ब्राम्हणशाहीचा अनैतीक कायदा...

मनुस्म्रुती कायद्याची हुकुमावली भारतभर पसरलेल्या बौद्ध धर्माचा पाडाव करण्यासाठी झाली. बौद्ध धर्म भारतात पसरला तेव्हा ब्रम्हणशाहीला तडा गेला. ज्यानेही बुद्ध तत्व ऐकले तो भिक्शुक झाल्याशिवाय राहत नसे. बुद्ध तत्वाचा समाजावर पगडा बसला होता. त्यामुळे ब्राम्हणांचे होम, कर्मकांडाचे धंदे बंद पडले. याचा परिणाम म्हणून ब्राम्हणांनी बंद केले आणि बौद्धांविरुद्ध शस्त्र उचलून त्याचा पाडाव करावयास सुरुवात केली. त्यांनी  बौद्ध धर्म प्रचारक भिक्खुंच्या कत्तली केल्या पण बुद्ध तत्वे माणसांच्या मनातुन जायला तयार नव्हती. म्हणून ब्राम्हणांना उच्च दर्जाचे स्थान मिळवून देण्यासाठी नी बुद्ध तत्व नाहीशी करण्यासाठी ब्राम्हणांनी मनुस्म्रुती कायद्याची सुरुवात केली.

मनुस्म्रूती ब्राम्हणांविशयी :
अ. 1, श्लो. (93) - ब्राम्हणाचा जन्म हा ब्रम्हाच्या मुखातुन झाला असल्याने त्याचा जन्म सर्वप्रथम झाला आहे म्हणून त्याला वेदाचा अधिकार आहे. विश्वनिर्मात्याने त्याला दिलेला हा अधिकार आहे.
1,(98) - पवित्र वेदांचा मुर्तीमंत अवतार म्हणजे ब्राम्हणाचा जन्म होय. तो देवच होय.
1, (100) - जगात जे काही आहे ती सर्व ब्राम्हणाची संपत्ती असते. त्याच्या उपजत बुद्धीमत्तेमुळे त्याला खरोखर या सर्व गोष्टींचा अधिकार प्राप्त होतो.
10,(3) - त्याच्या पावित्रामुळे ब्राम्हण हा सर्व जातींचा देव आहे.
7,(37) - तीनही वेदात निपुन पारंगत असलेल्या ब्राम्हणाची सकाळी लवकर उठून राजाने पूजा करावी.
11,(35) - ब्राम्हणाला विश्व निर्माता, शिक्षा देणारा, गुरू म्हणून घोशीत करण्यात आलेले असल्याने कोणतीही व्यक्ती त्याला अपमानास्पद बोलू शकत नाही किंवा अर्वाच्च शब्द ऊच्चारु शकत नाही.
9,(313) - जरी दैंन्यावस्ता आली तरी राजाने ब्राम्हणाला राग येईल असे प्रक्शुब्द वर्तन करू नये. जर ब्राम्हणाला राग आला तर तो सैंन्य व रथांच्या मदतीने त्याचा सर्वनाश करील.
11,(31) - ब्राम्हणाला कायदा माहीत असल्याने त्याचा अपराध करणाऱ्या अपराध्यास राजासमोर उभे न करता ब्राम्हण स्वतः त्याला शिक्षा देऊ शकतो.
9,(317) - ब्राम्हण मग तो सुशिक्षित असो किंवा नसो त्याला दैवी सामर्थ्य असते. अग्नीच्या अंगी जशी दैवी शक्ती असते तितकीच दैवी शक्ती ब्राम्हणांच्यात असते.
9,(319) - अश्याप्रकारे ब्राम्हणाने जरी कोणताही व्यावसाय केला तरी त्याचा सन्मान केला पाहीजे.
11,(6) - प्रत्येकाने स्वतःच्या क्षमतेनुसार एकांतप्रिय वेदाभ्यास करणाऱ्या ब्राम्हणास संपत्ती द्यावी म्हणजे म्रूत्युनंतर त्याला स्वर्गप्राप्ती होऊ शकते.

ब्राम्हणाच्या या व्याख्यामुळे मनुने ब्राम्हणास राजापेक्षाही वरचा दर्जा देण्यात आला होता.

मनुस्म्रूती शुद्रांविशयी :
(ब्राम्हण, क्षत्रीय व वैश्यांच्या कुटुंब प्रमुखांना )
1,(91) - ब्राम्हण, क्षत्रीय व वैश्य या तीन वर्णातील लोकांची सेवा करणे एवढेच काम परमेश्वराने शुद्रांना दिले आहे.
2,(31) - ब्राम्हणाच्या मुलाच्या नावातील पहिल्या भागातुन शुभसुचकता व्यक्त झाली पाहीजे. क्षत्रीयाच्या नावातुन शौर्य पराक्रम सुचित झाला पाहीजे. वैश्याच्या नावातुन संपत्ती आणि शुद्राच्या नावातुन तिरस्कार सुचित झाला पाहीजे.
4,(61) - ज्या देशात शुद्र राज्यकर्ता आहे त्या देशात राहु नये.
11,(24) - होम आदी धार्मिक विधीसाठी ब्राम्हणाने शुद्राकडे संपत्ती मागु नये.
8,(374) - उच्चवर्णीय विवाहात किंवा अविवाहीत स्त्रीशी जो शुद्र समागम करेन त्याला पुढील प्रमाणे शिक्षा करावी. जर अविवाहीत स्त्री असेल तर तो गुन्हा करणारा त्याच्या शरीराचा भाग कापून टाकावा. जर विवाहीत स्त्री असेल तर त्या शुद्रास म्रुत्यूदंड देऊन त्याची संपत्ती जप्त करावी.
8,(20) - जो वंशपरंपरेने ब्राम्हण आहे. मग त्याने वेदाचा अभ्यास केला असो वा नसो राजदरबारात त्यानेच न्यायदानाचे कार्य करावे. परंतु शुद्र कितीही सुशिक्षित असला तरी त्याला तो अधिकार नाही.
8,(272) - शुद्र जर ब्राम्हणाला धर्म शिकऊ लागला तर राज्याने त्याच्या तोंडात व कानात उकळते तेल ओतावे.
4,(99) - ब्राम्हण, क्षत्रीय , वैश्य यांनी शुद्रासमोर वेदपठण करू नये.
3 (156) - शुद्राने जर वेद पठण केला किंवा ऐकला तर त्याच्या कानात उकळत्या शिशाचा रस ओतावा, त्याची जीभ काटुन फेकावी.
10,(129) - शुद्राला जरी संपत्ती साठवण्याची क्षमता असली तरी तो गुलाम असल्याने त्याने धनसंचय करू नये.
10,(121) - ब्राम्हणाची चाकरी करून जर शुद्राचा चरीतार्थ चालत नसेल तर त्याने क्षत्रीयाची किंवा वैश्याची सुद्धा चाकरी करावी.
10,(123) - ब्राम्हणाची सेवा करणे हाच शुद्रासाठी सर्वोत्तम व्यावसाय सांगण्यात आला आहे. त्याखेरीज त्याने इतर कोणताही व्यावसाय केला तर त्याचे फल त्याला मिळणार नाही.
8,(417) - ब्राम्हण जर विपन्नावस्तेत असेल तर चरीतार्थासाठी त्याने विनासंकोच शुद्राची मालमत्ता जप्त करावी.
8,(413) - विश्व निर्मात्याने शुद्राला ब्राम्हणाचे गुलाम म्हणून निर्माण केले असल्याने त्याने ब्राम्हणाकडे मोबदल्याने किंवा विनामोबदला गुलामगिरी करावी.
8,(270) - जो शुद्र ब्राम्हणाचा अपमान करेल त्याची जीभ छाटुन टाकावी. कारण तो हलक्या जातीतील आहे.
8,(271) - जर शुद्राने तिरस्काराच्या भावनेने ब्राम्हणाच्या नावाचा वा जातीचा उच्चार केला तर त्याच्या 10 बोटात खिळे ठोकावेत व तोंडात लाल तप्त पहार कोंबावी.
8,(280) - शुद्राने हात किंवा काठी उगारली तर त्याचा हात छाटुन टाकावा. जर रागाने त्याने लाथ मारली तर त्याचे पाय कापून टाकावेत.

मनुस्म्रूती विवाहासंदर्भी :
3,(12) - ब्राम्हणाचा पहिला विवाह असेल तर स्वजातीतील स्त्रीशीच लग्न करावे. पुनर्विवाह असेल तर इतर 3 वर्णातील स्त्री असली तरी चालू शकेल.
3,(13) - शुद्र स्त्री ही शुद्राचीच पत्नी असली पाहीजे, ती आणि वैश्य स्त्री वैश्याची त्या दोघी व क्षत्रीयाची स्त्री क्षत्रीयाची त्या तिघी व ब्राम्हण स्त्री ब्राम्हणाची पत्नी होऊ शकते.
3,(15) - ब्राम्हणाने मुर्खपणाने शुद्र स्त्रीशी विवाह केला तर त्याचे कुटुंबिय व मुलांनाही शुद्राचा दर्जा प्राप्त होतो.

मनुस्म्रूती आर्थासंबंधी :
8,(35) - जी व्यक्ती ही संपत्ती माझी स्वतःची आहे असे खरे सांगेल त्या संपत्तीचा 6 वा किंवा 12 वा हिस्सा राजाने स्वतःकडे सुरक्षित ठेवावा.
8,(36) - परंतु जो खोटे विधान करेल त्याच्या संपत्तीचा 8 वा हिस्सा दंड म्हणून जप्त करावा. किंवा ज्या संपत्तीबाबत खोटे विधान केले असेल तितक्याच किंमतीचा त्याच्या मालकीची संपत्ती राजाने जप्त करावी.
8,(37) - विद्वान ब्राम्हणास जर गुप्त खजिना सापडला तर ती सर्व संपत्ती त्याने घ्यावी. कारण ब्राम्हण सर्वाचा प्रमुख आहे.
8,(38) - परंतु एखादी संपत्ती पूर्वी जमिनीत ठेवली असेल व ती संपत्ती राजाला सापडली तर राजाने अर्धी संपत्ती घ्यावी व उरलेली अर्धी संपत्ती ब्राम्हणास द्यावी.

मनुस्म्रृती स्त्रीयांविशयी :
मनुने स्त्रियांना नेहमी तुच्छ मानले.
2,(213) - पुरूषांना भ्रश्ट करणे हा स्त्रियांचा स्वभावच आहे. स्त्रियांच्या सहवासात शहाणा माणूस कधीच सुरक्षित राहू शकत नाही.
2,(214) - फक्त मुर्खांनाच नव्हे तर विद्वान पुरूषांनाही स्त्रिया आडवाटेने नेण्यास समर्थ असतात. स्वतःच्या क्रोधाने व ईच्छेने त्या पुरूषांना गुलाम बनवतात.
2,(215) - कोणत्याही व्यक्तीने स्वतःच्या आईजवळ, बहीनीजवळ किंवा मुलीजवळ एकांतात बसू नये कारण  पुरूषाच्या भावना या अतिशय तीव्र असतात.
9,(2) - दिवस आणि रात्र 24 तास कुटुंबातील पुरूषाच्या नजरेत स्त्रीला ठेवले पाहीजे. जर कामवासनेचा आनंद हवा असेल तर तिला एकाच पुरूषाच्या नियंत्रनाखालि ठेवले पाहीजे.
9,(3) - स्त्रीचे बालपणी तिचा पिता तिचे रक्षण करतो, तरुणपणी पती आणि व्रूद्ध वयात तिची मुले संरक्षण देतात. कोणत्याही काळात स्त्री स्वतंत्र राहण्यास योग्य नाही.
9,(14) - स्त्रियांनी स्वतःच्या सौंदर्याची फिकीर करू नये किंवा विशिष्ट वयावर लक्ष केंद्रित करू नये. तो पुरूष आहे. मग तो कुरुप आहे की सुंदर याचा विचार करू नये. फक्त पुरूष आहे एवढाच विचार करावा.
4,(147) - मुलीने, तरूण स्त्रीने किंवा वयस्कर स्त्रीने कोणतीही गोष्ट स्वतःच्या स्वतंत्र बुद्धीने करू नये.
5,(149) - स्त्रीने स्वतःला पिता, पती व पुत्र यांच्यापासुन अलग, वेगळे स्वतंत्र समजू नये. तसे तिने केल्यास तिला तुच्छ मानले जाईल.
9, (45) - एकदा स्त्रीने विवाह केला की ती स्त्री पतीपासुन कधीही स्वतंत्र राहू शकत नाही.
9,(416) - पत्नी, मुलगा व गुलाम या तिघांचा संपत्तीचा अधिकार नाही. त्यानी कमवलेली संपत्ती ही ते ज्याच्यावर अवलंबून असतील त्याच्या मालकीची होते.
8,(299) - पत्नी मुलगी ने चूक केल्यास त्यांना दोराने किंवा काठीने मारावे.
9,(18) - स्त्रियांना वेदाभ्यासाचा अधिकार नाही.
4,(206) - स्त्रीला बुद्धीमत्ता नसते. किंवा मुक्त इच्छा , विचारस्वातंत्र नसते. त्यानी बौद्ध धर्मासारख्या पाखंडी मार्गाने जाऊ नये. तिने जर त्याच मार्गाने जाण्याचा निर्धार केला असेल तर मेल्यावर अश्या स्त्री च्या तोंडात पाणी सुद्धा टाकू नये.
5,(151) - विवाहीत स्त्रीने पती हयात असेपर्यंत त्याच्या आद्न्येत रहावे.
5,(154) - जरी पती दरिद्री असला किंवा गुणवान असला किंवा अन्य ठिकाणी आनंद उपभोगत असेल किंवा उत्तम गुणवत्तेचा अभाव असेल तरीही पतीला परमेश्वर मानून त्याची श्रद्धापुर्वक पूजा केली पाहीजे.
9,(4) - योग्य वेळी मुलीचा विवाह करीत नाही तो पिता दोशी असतो. पहिल्या मासिक पाळी नंतर 3 वर्षाच्या आत मुलीचा विवाह झाला पाहीजे.

   अश्या प्रकारचे अनेक अनैतीक कायदे मनुने मांडले. ब्राम्हणशाहीचे वर्चस्व व ब्राम्हणी सत्तेसाठी परिपूर्ण तरतूद मनुच्या कायदियानी समाजात रोवली. ही एक प्रकारची ब्राम्हणी हुकुमशाही होती. आणि म्हणूनच बाबासाहेबांना या मनुला पेटवावे लागले. 

Saturday, 14 May 2016

बौद्ध धर्माच्या र्हासाची सुरुवात…

बौद्ध धर्माच्या र्हासाची सुरुवात…

बौद्ध धर्म खऱ्या अर्थाने सम्राट अशोकाच्या काळात सर्व भारतात पसरला. अशोक गादीवर आला तेव्हा त्याने मौर्य साम्राज्याचा विस्तार केला. त्याने त्याच्या राज्यात बुद्ध विचारांचा पाया बसवला. त्यामुळे ब्राम्हणशाहीला फार मोठा धक्का बसला.
   अशोकाच्या काळात ब्राम्हणांकडे दुर्लक्ष केले गेले. त्यांना समाजात दुय्यम स्थान मिळाले. ब्राम्हण धर्म विधीतील महत्वाचा घटक असलेल्या सर्व प्रकारच्या पशुबळीस अशोकाने बंदी घातली. त्यामुळे ब्राम्हण निश्प्रभ झाले. ब्राम्हण केवळ राजाश्रयच गमावुन बसले नाहीत तर त्याचा जो होम करण्याचा मूळ व्यावसायच बंद पडला. त्या होमासाठी ते भरमसाट पैसे घेत असत व त्यावर चरीतार्थ चालवत असत. त्यामुळे मौर्य साम्राज्याचा र्हास होईपर्यंत सुमारे 140 वर्ष ब्राम्हण हे समाजातील दुय्यम घटक बनले होते. या बौद्ध धर्माच्या राज्याविरुद्ध बंद करणे हा एकमेव मार्ग त्यांना राहिला होता. त्यामुळे पुश्यमित्र च्या नेत्रुत्वाखाली मौर्य साम्राज्याविरुद्ध बंडाचे निशाण फडकावले गेले.
    बौद्ध धम्म नाहीसा करून ब्राम्हणशाही बसवणे हा एकमेव उद्देश पुश्यमित्राने ठेवला.
     शेवटचा मौर्य सम्राट अशोकाचा वंशज ब्रुहद्रथ मौर्याची कपटपुर्वक हत्या करुन पुश्यमित्र जेव्हा गादीवर आला तेव्हा त्याने वैदिक पद्धतीप्रमाणे अश्वमेध यङ्य केला की ज्यामुळे सार्वभौम सत्ता स्थापन करणे शक्य होते.
    बौद्ध धर्माचे खास वैशिष्ट्य पशुंच्या जीवनाबद्दल कमालीचा आदर होय. अशोकाचा पशु हत्या बंदी कायदा मोडून पुश्यमित्राने अश्वमेध करून पशुबळीस सुरुवात केली. आणि नंतर सुमारे 500 वर्ष हे पशुबळी होम चालू राहीले.
      त्याचबरोबर पुश्यमित्राने बौद्ध भिक्खुंचा अमानुश छळ सुरु केला. जे बौद्ध धर्माचा प्रसार करतील अश्या भिक्खुंच्या कत्तली केल्या जिवाच्या आकांताने बौद्ध भिक्खुंनां भारत सोडून शेजारील देशात पलायन करावे लागले. तिथेच बौद्ध धम्माच्या र्हासाची सुरुवात झाली.

Friday, 6 May 2016

बलात्कारी प्रियकराला एका पिडीतेच पत्र ...


एका प्रियकराकडुनच झालेल्या बलात्कार पिडीतेने विचारलेला जाब....



माझ्या बलात्कारी प्रियकराला पत्र...

हॅलो,
आठवल मी कोण आहे? कारण मी खात्रीपुर्वक तुला विसरू शकत नाही. आपल्याला भेटून फक्त 6 च आठवडे झाले होते तेव्हा. पण तेव्हापासून आजतोवर मी तुझ्या त्या दिलेल्या आठवनींच्या यातनांची शिक्षा भोगते आहे. तू तर कधी विचार पण केला नसशिल इतकी तुझी ती गुन्हेगारी मला आतून पोखरत आहे. मार्च 5, 2015 (हो मला ती तारीख चांगली आठवनीत आहे.) तू माझ्यावर बलात्कार केलास. मी किती विनवणी केली होती तुला, 'नको रे, नको. सोड मला.' Please stop it. पण तू माझी एक ऐकली नाहीस. मी कधीच असा विचार केला नव्हता माझी पहिली वेळ कशी राहील. नी असा तर मुळीच नाही की पहील्याच वेळी माझ्यावर बलात्कार होईल.
मी एक नाजूक पोर होते रे. तू माझी एक ऐकली नाहीस. नी माझ्या निरागस शरीरावर वार करत राहीलास. मी किती मुर्ख होते. तुला किती चांगला समजत होते. माझ्या मैत्रीनींनी पण मला तुझ्यापासुन दूर रहायला सांगितले होते. पण मी त्यांची एक ऐकली नाही. तू माझ्या मनात बसला होतास. पण तू पण इतरांसारखाच निघालास.   You stole my virginity. नी त्या दिवसापासुन मला मी स्वतःलाच हीन वाटू लागली. मी माझ कौमार्य तुला दिल नव्हतं. तू ते हिसकावल. तुला फक्त माझ शरीर पाहिजे होत. माझ मन नाही. का? का तुम्ही मूल आम्हा मुलींच्या मनाची कदर करत नाहीत? का तू तुझी बळजबरी थांबवली नाहीस? तुझ्या मित्रांन्नी काय तुला शाबासकी  दिलि जेव्हा तु त्यांना सांगीतलस की तू माझ्यासोबत प्रणय केलास? प्रणय नव्हे तो बलात्कार केलास? काय पुरुशार्थ वाटला तुला त्या जबरदस्तीत?
आज 8 महिने झाले मी हे ओझे मनावर घेवुन शांत आहे. पण आता त्या त्या दिवसाच्या यातना सहन होत नाहीत. मी का त्या कलंकाच ओझ घेऊ? मी त्या पापाची गुन्हेगार नाहीय. त्या गुन्ह्याचा गुन्हेगार तू आहेस. तो तू होता ज्याच्यामुळे मी आजही जगण्यासाठी झुंजते आहे. तो त आहेस ज्याच्यामुळे मला या हॉस्पीतळाच्या खाटेवर पडून तू केलेल्या नुकसानीची सजा भोगावी लागत आहे. मला या दुःखाच्या खाईत लोटनारा तू आहेस. या वेदनांचा हक्कदार तू आहेस. तुला हे ऐकाव लागेल. ' प्रियकरानेच प्रियसीचा बलात्कार केला' हे तुला मान्य कराव लागेल. You sencerily have to be sorry for raping me. तुला हे ओझ घ्याव लागेल. आजवर तू ते माझ्यावर लेटुन पळत राहीलास. आता तुला पण तू केलेल पाप घेऊन जगाव लागेल.
शेवटी मी फक्त एकच इच्छा करू शकते की तू परत कुणा दुसऱ्या मुलीला या खाईत ओढणार नाहीस.


तुझ्या बलात्काराची पिडीत.

                            घोडेबाजार  त्या अलिशान हाॅटेलाच्या संडासात लपवलेला फोन स्विच ऑन करताच थरथर करून वाजला. हाय, हॅलो ची औपचारिकता न ...