मी रस्त्याने चालत होतो. साधारण सकाळी 8-9 ची वेळ होती. रस्त्याच्या बाजूला एका हॉटेलात चहा-पाण्यासाठी थांबलो. मला माझ्या बाजूच्या खिडकीतून समोरच्या फुटपाथ वर एक मुलगी बसलेली दिसली. सकाळच्या थंडीने तीच अंग कुडकुडत होत. हातात असलेल्या कापडाच्या पुडक्याला अंगाशी कवटाळत ती स्वतःला आवळुन बसली होती. हळूच येणाऱ्या जाणार्याला तीच्याजवळ असलेली ताटली वर करून काहीतरी देण्याची विनवणी करत होती. लोक तिच्याकडे दुर्लक्ष करून निघून जात होते. तिचा चेहरा खूप केविलवाणा झाला होता.
मी पटकन माझा चहा संपवला नि बाहेर गेलो. मी माझे पाकीट तपासले, म्हटल 5-10 रुपये देऊ तिला काही खायला. मी तिच्याजवळ गेलो. ती रडत होती नी तिच्या हातात ते कापडाच पुंडक नसून एक लहान बाळ होत. ते बघून मी तर धस्स झालो. साधारण 14-15 वर्षाची असेल ती नी आपल्या बाळाला घेऊन थंडीची रस्त्यावर कुडकुडत होती.
तिने वर पाहील नी मला 2-4 रुपये चिल्लर साठी विचारल. मी तिला विचारल काहीतरी खायला पाहिजे का? मी तडक समोरच्या दुकानात गेलो नी तिच्या बाळासाठी एक दुधाची बाटली आणली (साधारण 2-3 महीण्याच असेल बाळ) नी तिला घेऊन मी त्या हॉटेलात गेला. तिला एक-एक समोसा,वडापाव दिला. तिने तो गिळल्यागतच खाल्ला. परत एक चहा बिस्कीट मागवले. मग न राहऊन ती खुलुन बोलली. ती 15 वर्षाची होती, तिच्या अल्लड वयाचा नराधम वर्गमित्राने फायदा उचलला. नको त्या वयात ती गर्भवती झाली. पोट दिसू लागल तेव्हा घरचे त्रास देऊ लागले. आजुबाजुला बोंब होईल म्हणून घरातच डांबुन ठेऊ लागले, मारू लागले. त्या जाचाला कंटाळुण ती घरातून पळुन गेली. अशीच ती वर्षभर हिंडत राहीली.
मी तिला विचारल तुला घरी जावस वाटतय का? मी मदत करू का? ती बोलली घरचे तिला आता घेणार नाहीत. मी परत परत विचारल तेव्हा ती बोलली की तिने घरातून पळालि तेव्हा घरातले 5000 रुपये घेऊन पळालि होती. ते 5000 रु. तर पुरलेच नाही शिवाय एका 15 वर्शाच्या मुलीसाठी फुटपाथच जगण पदरी पडल. जे असह्य होत. तीने घरी जाण्याचा खूप विचार केला पण तिने जे केल त्यानंतर तिला कोणी घरात घेतल नसत या विचाराने ती धजलीच नाही.
मी तिला माझा मोबाईल काढून दिला नी सांगितल एकदा बोलून बघ घरच्यांशी. बघू कुणीतरीं काही बोलत का ते. ती घाबरली. साफ मना केल. मी म्हटल नंबर दाब मी बोलून बघतो. ती नाही बोलली. कसतरी मी तिला राजी केल. तीने नंबर दाबला. मी फोन घेतला. तिच्या आईने फोन ऊचलला. मी माझा अनपेक्शीत परिचय दिला आणि सांगीतल तुमच्या मुलीला तुमच्याशी बोलायच आहे. थोडा वेळ दोन्हीकडे शांतता पसरली. मग मी तिकडुन रडण्याचा आवाज ऐकला. मी त्या मुलीकडे फोन दिला. ती काही बोललीच नाही. नुसती आईचा रडण्याचा आवाज ऐकत होती. मग ती पण रडायला लागली. हळुच रडता रडता आई बोलली. माझे डोळे पाणावले. खूप वेळ ती बोलतच होती. मग तिने माझ्याकडे फोन दिला. मी तिच्या आई सर्व सांगीतल. समजावल.
मी तिला बस स्टंड पोचवल. तीच टिकीट काढल, पाणी, स्नँक्स , डायपर प्रवासासाठी हाताशी दिल. जाता जाता मी तिच्या बाळाला हातात घेतल. त्याला कावटाळल. तिच्या डोक्यावरुन हात फिरवला नी तिला गाडीत बसवल.
आज वर्शभरानंतर वाटतय आपण काहीतरी का होईना एक चांगल काम केल. जगातला बदल हा आपल्याच पासून सुरु होतो.