Thursday, 19 January 2023

                            घोडेबाजार 

त्या अलिशान हाॅटेलाच्या संडासात लपवलेला फोन स्विच ऑन करताच थरथर करून वाजला. हाय, हॅलो ची औपचारिकता न करताच समोरून आवाज शुट झाला.

: माणिकराव, काय पाहिजे?

: उद्योग, सहकार, कृषी, पर्यटन...आणि विलेपार्ल्याला एक फ्लॅट...

: दिलं.

दुसर्‍या दिवशी सकाळीच TV9 वर बातमी खाल्ली, 'माणिकराव गोव्याच्या ग्रँड हाॅटेलातून पाच आमदार घेऊन फरार, जनता पक्षाला जाऊन मिळाल्याची सूत्रांकडून माहिती...' 


~ उल्हास निकम 

                            घोडेबाजार  त्या अलिशान हाॅटेलाच्या संडासात लपवलेला फोन स्विच ऑन करताच थरथर करून वाजला. हाय, हॅलो ची औपचारिकता न ...