Thursday, 13 August 2020

Forever Together

When I was striving in the dark,

You bring me the brightness of the stars,

When I was broken and cried hard,

You soothe my eternal war,


The world sloth when I demand,

Kicked apart all my struggling command,

Time taught me the life lesson 

When nobody remained to mention,


You

Only you 

The one who bring me up 

Shining my defeated Mind,

I bow to you now and forever, 

As you were there, I will be there for you forever,

Be always as you were in my life.

Forever together.....

Tuesday, 2 June 2020

भगवान बुद्ध आणि अनाथपिंडक

                 भगवान बुद्ध आणि अनाथपिंडक

भगवान बुद्धांच्या काळात श्रावस्तीला सुदत्त नावाचा एक  कोषाध्यक्ष राहत  असे. गरिबांना मुक्त हस्ते दान देत असल्यामुळे त्याला संपूर्ण राज्यात अनाथपिंडक म्हणून ओळखले जात असे. 

तथागत राजगृह येते विहार करीत असताना तो आपल्या कामानिमित्त राजगृह गेला असता त्याला कळले कि तथागत राजगृहात आले आहेत. तो तथागत ज्या ठिकाणी होते तिथे गेला. 

तथागतांनी त्याला उचित धर्मोपदेश केला. शेवटी तो तथागतांना म्हणाला " मी जाणू इच्छितो कि मी आपली संपत्ती , आपले घर , आणि आपला उद्योग व्यवसाय यांचा त्याग करून आपल्या धर्म जीवनाच्या सुख प्राप्ती करीता गृहत्याग करून बेघर होणे माझ्याकरता हे उचित आहे काय ? "

तथागत म्हणाले म्हणाले " जो जो व्यक्ती श्रेष्ठ अष्टांगिक मार्गाचा पथिक आहे त्या प्रत्येक व्यक्तीस धर्म जीवनाचे सुख प्राप्त आहे. परंतु जो संपत्तीला आसक्त होऊन चिकटून राहिलेला आहे , त्याचे हेच उत्तम मंगल आहे कि त्याने आपले हृदय धनाच्या  आसक्तीनें विषारी  न बनविता त्या धनाचा त्याने उचित उपयोग  करणे, असा व्यक्ती आपल्या बांधवांसाठी एक वरदान आहे."

" तथागत तुम्हाला सांगतात  कि तुम्ही गृहस्तीच राहा. आपल्या उद्योग धंद्यात कारभारात  अप्रामादपूर्वक कार्यरत राहा. मनुष्याचे जीवन, ऐश्वर्य  आणि अधिकार हे मनुष्यास दास बनवीत नाहीत तर जो त्या धनाप्रती आसक्त आहे ती आसक्ती त्यास  गुलाम बनविते. भिक्कू झाल्यानंतर आरामदायी जीवन व्यतीत करता येईल या करीता जो संसार त्याग करतो त्यास कोणताच  लाभ होत नाही. कारण  आळसाचे जीवन हे घृणित  जीवन आहे आणि शक्तीचा अभाव हे स्पृहणीय नाही. जो  अंतःप्रेरणा नसेल तोपर्यंत तथागतांचा धम्म कोणासही प्रवज्जीत होण्यास, संसाराचा त्याग करण्यास सांगत नाही. तथागतांचा धम्म प्रत्येकाकडून हीच मागणी करतो कि त्यांनी आत्मवादी दृष्टीतून मुक्त व्हावे. त्यांचे मन परिशुद्ध असावे. त्यास काम-भोगादि  यांची तृष्णा नसावी. आणि त्यांनी श्रेष्ठ धम्म जीवन व्यतीत करावे. 

" मनुष्याचा कोणताही व्यवसाय असेल, तो शिल्पकार असेल, किंवा व्यापारी असेल, सरकारी नोकरी करीत असेल, किंवा संसार त्याग करून ध्यान भावना या मध्ये व्यग्र असेल, त्यांनी आपले कार्य पूर्ण मनापासून केले पाहिजे, त्यात परिश्रमी आणि उत्साही राहिले पाहिजे. जसे कमल पाण्यात असून सुद्धा पाण्यापासून अस्पर्शित राहते तसे कमळ  पुष्प प्रमाने राहिले पाहिजे. जीवन संघर्षात त्याने आपल्या मनात ईर्षा व घृणा यांना स्थान देता कामा नये. संसारात राहून  देखील जर का ते स्वार्थपूर्ण जीवन न जगता इतरांच्या कल्याणा करीता जीवन जगता  असतील  तर या बाबतीत किंचितही संदेह असणार नाही कि त्यांचे मन आनंद , शांती  आणि सुख यांनी भरून जाईल. "

अनाथपिंडकास वाटले हाच सत्य धर्माचा मार्ग आहे. आणि त्याने तथागताच्या चरणावर नतमस्तक होऊन आजन्म  तथागताच्या धम्माचा शरणागत उपासक राहण्याचे वचन दिले. 

संदर्भ : भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म.

Tuesday, 26 May 2020

बाबासाहेबांचे रमाबाईस पत्र - २

              बाबासाहेबांचे रमाबाईस पत्र - २

रमा, तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर…
रमा !
कशी आहेस रमा तू? तुझी, यशवंताची आज मला खूप आठवण आली. तुमच्या आठवणीनं मन खूपच हळवं झालं आहे आज. मागल्या काही दिवसातली माझी भाषणे फारच गाजली. परिषदेतील सर्वोत्कृष्ट भाषणे, प्रभावी वक्तृत्वाचा सर्वोत्कृष्ट नमुना असे माझ्या भाषणांबद्दल इकडच्या वर्तमानपत्रांमधून लिहून आले आहे. या पहिल्या गोलमेज परिषदेतील माझ्या भूमिकेचा विचार मी करीत होतो. आणि डोळयापुढे आपल्या देशातील सर्व पीडितांचे संसार माझ्या डोळयासमोर उभे राहिले.
दुःखांच्या डोंगराखाली ही माणसे हजारो वर्षे गाडली गेली आहेत. या गाडलेपणाला पर्याय नाही हीच त्यांची समजूत आहे. मी हैराण होतो आहे रमा ! पण मी झुंज देतो आहे. माझी बौध्दिक शक्ती परमवीर झाली होती जणू ! खूप भावना मनात दाटून आल्या आहेत. खूपच हळवे झाले आहे मन. खूपच व्याकूळ झाले आहे मन! आणि घरातल्या तुम्हा सर्वांची आठवण आली. तुझी आठवण आली. यशवंताची आठवण आली.
मला तू बोटीवर पोचवायला आली होतीस. मी नको म्हणत होतो तरी तुझे मन तुला धरवले नाही. तू मला पोचवायला आली होतीस. मी गोलमेज परिषदेला जात होतो. माझा सर्वत्र जयजयकार सुरु होता. तू पाहत होतीस. तुझं मन गदगदून आलं होतं. कृतार्थतेनं तू ओथंबून आली होतीस. तू शब्दांनी बोलत नव्हतीस; पण तुझे डोळे जे शब्दांना सांगता येत नसते तेही सांगत होते. तुझं मौन शब्दाहून अधिक बोलकं झालं होतं. तुझ्या गळयातील आवंढा तुझ्या ओठापर्यंत येऊन थडकत होता. ओठातील शब्दांच्या भाषेपेक्षा डोळयातील आसवांचीच भाषा त्यावेळी तुझ्या मदतीला धावली होती.
आणि आता इथे लंडनमध्ये या साऱ्याच गोष्टी मनात उभ्या राहिल्या आहेत. मन नाजूक झाले आहे. जीवात कालवाकालव होत आहे. कशी आहेस रमा तू ! आपला यशवंत कसा आहे? माझी आठवण काढतो तो? त्याचे संधीवाताचे दुखणे कसे आहे? त्याला जप रमा ! आपली चार मुलं आपल्याला सोडून गेलीत. आता आहे फक्त यशवंत. तोच तुझ्या मातृत्त्वाचा आधार आहे आता. त्याला आपण जपलं पाहिजे. यशवंताची काळजी घे रमा ! यशवंताला खूप अभ्यास करायला लाव. त्याला रात्री अभ्यासाला उठवीत जा. माझे बाबा मला अभ्यासासाठी रात्री उठवीत. तोवर ते जागे राहत. मला ती शिस्तच त्यांनी लावली. मी उठलो, अभ्यास सुरु केला की ते झोपत असत. अगदी प्रारंभी मला रात्री अभ्यासाला उठण्याचा कंटाळा येई. त्यावेळी अभ्यासापेक्षा झोप महत्त्वाची वाटे. पुढे तर आयुष्यभरासाठी झोपेपेक्षा अभ्यासच मोलाचा वाटत राहिला. याचं सर्वात जास्त श्रेय माझ्या बाबांना आहे. माझ्या अभ्यासाची वात तेवत राहावी म्हणून माझे बाबा तेलासारखे जळत राहत. त्यांनी रात्रीचा दिवस केला. अंधाराचा उजेड केला. माझ्या बाबांच्या कष्टांना आता फळे आली. फार फार आनंद वाटतो रमा आज. रमा यशवंताच्या मनाला असाच अभ्यासाचा छंद लागला पाहिजे. ग्रंथाचा त्याने ध्यास घेतला पाहिजे.
रमा, वैभव, श्रीमंती या गोष्टी निरर्थक आहेत. तू अवतीभोवती पाहते आहेसच. माणसं अशाच गोष्टींच्या सारखी मागे लागलेली असतात. त्यांची जीवनं जिथून सुरु होतात तिथच थांबलेली असतात. या लोकांची आयुष्ये जागा बदलीत नाहीत. आपल्याला असं जगून चालायचं नाही रमा. आपल्याजवळ दुःखांशिवाय दुसरं काहीच नाही. दारिद्रय, गरिबी यांच्याशिवाय आपल्याला सोबत नाही. अडचणी आणि संकटे आपल्याला सोडीत नाहीत. अपमान, छळ, अवहेलना या गोष्टी आपल्याला सावलीसारख्या जखडलेल्या आहेत.
मागे अंधारच आहे. दुःखाचे समुद्रच आहेत. आपला सूर्योदय आपणच झाले पाहिजे रमा. आपणच आपला मार्ग झाले पाहिजे. त्या मार्गावर दिव्यांची ओळ आपणच झाले पाहिजे. त्या मार्गावर जिद्दीचा प्रवास आपणच झाले पाहिजे.
आपणाला दुनिया नाही. आपली दुनिया आपणच निर्माण केली पाहिजे. आपण असे आहोत रमा. म्हणून म्हणतो यशवंताला खूप अभ्यास करायला लाव. त्याच्या कपडयांची काळजी घे. त्याची समजूत घाल. त्याच्यात जिद्द जागव. मला तुझी सारखी आठवण येते. यशवंताची आठवण येते.
मला कळत नाही असं नाही रमा, मला कळतं की तू दुःखांच्या या वणव्यात स्वतः करपून जात आहेस. पाने गळत जावीत आणि जीव सुकत जावा त्याप्रमाणे तू होते आहेस. पण रमा मी तरी काय करु ! एका बाजूने हात धुवून पाठीशी लागलेले दारिद्रय. दुसऱ्या बाजूने माझ्या जिद्दीने घेतलेला वसा. वसा ज्ञानाचा !
मी ज्ञानाचा सागर उपसतो आहे. मला इतर कशाचे यावेळी भान नाही; पण ही शक्ती मला मिळवण्यात तुझाही वाटा आहे. तू इथे माझा संसार शिवत बसली आहेस. आसवांचे पाणी घालून माझे मनोबल वाढवीत आहेस. म्हणून मी बेभान मनानं ज्ञानाच्या तळगर्भाचा वेध घेतो आहे.
खरं सांगू रमा, मी निर्दय नाही. पण जिद्दीचे पंख पसरून आकाशात उडणाऱ्या मला कोणी सादही घातली, तरी यातना होतात. माझ्या मनाला खरचटतं आणि माझ्या रागाचा भडका उडतो. मलाही हृदय आहे रमा ! मी कळवळतो. पण मी बांधलो गेलो आहे क्रांतीशी ! म्हणून मला माझ्या स्वतःच्या भावना चितेवर चढवाव्या लागतात. त्याच्या तुला, यशवंतालाही कधी झळा पोचतात. हे खरं आहे; पण यावेळी रमा मी हे उजव्या हाताने लिहितो आहे आणि डाव्या हाताने अनावर झालेली आसवे पुसतो आहे. सुडक्याला सांभाळ रमा. त्याला मारु नको. मी त्याला असे मारले होते. त्याची आठवणही कधी त्याला करुन देऊ नको. तोच आता तुझ्या काळजाचा एकुलता एक घड आहे.
माणसांच्या धार्मिक गुलामगिरीचा, आर्थिक आणि सामाजिक उच्चनीचतेचा आणि मानसिक गुलामगिरीचा पत्ता मला शोधायचा आहे. माणसाच्या जीवनात या गोष्टी ठाण मांडून बसलेल्या आहेत. त्यांना पार जाळून-पुरुन टाकता आला पाहिजे. समाजाच्या स्मरणातून आणि संस्कारातूनही या गोष्टी नाहीशा झाल्या पाहिजेत.
रमा ! तू हे वाचते आहेस आणि तुझ्या डोळयात आसवं आली आहेत. कंठ दाटला आहे. तुझं काळीज थरथरायला लागलं आहे. ओठ कापू लागले आहेत. मनात उभे राहिलेले शब्द ओठापर्यंत चालतही येऊ शकत नाहीत. इतकी तू व्याकूळ झाली आहेस.
रमा, तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर? तू मनःसाथी म्हणून मिळाली नसतीस तर? तर काय झालं असतं? केवळ संसारसुखाला ध्येय समजणारी स्त्री मला सोडून गेली असती. अर्धपोटी राहणे, गोवऱ्या वेचायला जाणे वा शेण वेचून त्याच्या गोवऱ्या थापणे किंवा गोवऱ्या थापायच्या कामावर जाणे कोणाला आवडेल? स्वयंपाकासाठी इंधन गोळा करायला जाणे, मुंबईत कोण पसंत करील. घराला ठिगळे लावणे, वस्त्रांना शिवत राहणे, एवढयाच काडयाच्या पेटीत महिना निभला पाहिजे, एवढेच ध्यान्य, एवढेच तेलमीठ पुरले पाहिजे हे माझ्या मुखातून बाहेर पडलेले गरिबीचे आदेश तुला गोड वाटले नसते तर? तर माझे मन फाटून गेले असते. माझ्या जिद्दीला तडे गेले असते. मला भरती येत गेली असती आणि तिला त्या त्या वेळी लगेच ओहोटीही लागली असती. माझ्या स्वप्नांचा खेळच पार विस्कटून गेला असता रमा ! माझ्या जीवनाचा सगळा सूरच बेसूर झाला असता, सगळीच मोडतोड झाली असती. सगळाच मनःस्ताप झाला असता. मी कदाचित खुरटी वनस्पतीच झालो असतो. जप स्वतःला जशी जपतेस मला. लवकरच यायला निघेन काळजी करु नकोस.
सर्वांस कुशल सांग.
कळावे,
तुझा
भीमराव

लंडन
३० डिसेंबर १९३०

Friday, 3 January 2020

बुद्ध आणि अहिंसा

बुद्ध आणि अहिंसा

तथागत बुद्धांना नेहमी अहिंसे शी जुडले जाते पण त्यांची अहिंसा म्हणजे नेमकी कोणती? तथागतांना अहिंसा म्हणजे नेमकं काय अपेक्षित होत?

बुद्ध हे हिंसेच्या विरोधात होते. परंतु त्याच वेळेस ते न्यायाच्या बाजूने पण होते आणि त्यांनी न्यायाकरिता आवश्यक असेल तर बळाच्या वापराची अनुमती दिली. हि बाब त्याच्या वैशालीच्या सेनाप्रमुख सिह सेनापती यांचेशी झालेल्या संवादातून अधिकच स्पष्ट होते.

सिह सेनापतींना जेव्हा कळले कि बुद्ध हे अहिंसेचा उपदेश देत आहेत, तेव्हा तो बुद्धाकडे गेला आणि म्हणाला : "भगवान बुद्ध हे अहिंसेची शिकवण देतात, काय भगवान अपराध्याला शिक्षेपासून मुक्तता देण्याची शिकवण देतात काय? काय भगवान असे शिकवतात कि आम्ही आमच्या पत्नी, आमची संताने, आमची संपत्ती यांचे संरक्षण करन्याकरता देखील युद्ध करू नये? अहिंसेच्या नावाखाली काय अत्याचार्यांकडून आम्ही त्रस्त व्हावे? काय तथागत सर्व  प्रकारचे युद्ध मग ते सत्य आणि न्याय कारणासाठी असले तरी निषाद मानतात काय? "

बुद्ध म्हणाले : "मी जे काही शिकवतो आहे, त्याविषयी तुम्ही गैरसमज करून घेतला आहे. अपराध्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि निर्दोश व्यक्तीला स्वतंत्र मिळालेच पाहिजे. जेव्हा न्यायाधीश हा गुन्हेगाराला शिक्षा देतो तेव्हा त्यात त्याची काही चूक नसते. शिक्षेला कारणीभूत गुन्हेगाराचा अपराध असतो.जो न्यायाधीश अपराध्याला दंडित करतो तो फक्त कायद्याचे पालन करत असतो. त्याने अहिंसा पाळली नाही असा ठपका त्याच्यावर ठेवता येणार नाही. अशी व्यक्ती जी न्यायाकरता आणि सुरक्षितताकारता लढते तिला अहिंसे विषयी दोषी धरले जाऊ शकत नाही. जर शांतता प्रस्तापित करण्याचे सर्व मार्ग असफल झाले तर हिंसेची जबाबदारी त्याच्यावर येते ज्याने युद्ध सुरु केले आहे. दुष्ट शक्तीपुढे कधीही शरणागती पत्करता कामा नये. तिथे युद्ध होऊ शकेल. परंतु ते युद्ध स्वार्थी हेतू करीत नसावे..."

(Dr. Babasaheb Ambedkar : writtings and speeches )

                            घोडेबाजार  त्या अलिशान हाॅटेलाच्या संडासात लपवलेला फोन स्विच ऑन करताच थरथर करून वाजला. हाय, हॅलो ची औपचारिकता न ...