C/o henry s. King & co.
At pall mall
London
25th Nov. 1921
प्रिय रामू, नमस्ते.
पत्र पोचले. गंगाधर आजारी असल्याचे ऐकून वाईट वाटले. नशिबाचा ठेवा. त्याची चिंता करण्यात काही फायदा नाही.
तुझा अभ्यास चालला आहे, ही फार आनंदाची गोष्ट आहे. पैशा-संबंधाने तजवीज करत आहे. मी अन्नास मोताद झालो आहे. तेव्हा मजजवळ पाठविण्यास काही नाही. तरीपण तुमचा बंदोबस्त मी करीत आहे. वेळ जर लागला आणि तुझे पैसे जर संपले तर दागिने मोडून खा. मी आल्यावर तुझे दागिने तुला भरुन देईन. यशवंत व मुकुंद याचे शिक्षण कसे चालले आहे? काही कळविले नाही.
माझी प्रकृती ठीक आहे. काही चिंता नसावी. अभ्यास काही संपला नाही. जून महीन्यात येणे होईल असे दिसत नाही. पुढे कळविन.
सखु व मंजुळा यांच्यासंबंधी काही कळाले नाही. तुला पैसे पोहचल्यानंतर मंजुळाला व लक्ष्मीच्या आईस एक एक (प्रत्येकी) लुगडे घेणे.
सर्वांस कुशल,
भिमराव
- शंकरची काय हालहवाल? गजरा कशी आहे?

No comments:
Post a Comment