घोडेबाजार
त्या अलिशान हाॅटेलाच्या संडासात लपवलेला फोन स्विच ऑन करताच थरथर करून वाजला. हाय, हॅलो ची औपचारिकता न करताच समोरून आवाज शुट झाला.
: माणिकराव, काय पाहिजे?
: उद्योग, सहकार, कृषी, पर्यटन...आणि विलेपार्ल्याला एक फ्लॅट...
: दिलं.
दुसर्या दिवशी सकाळीच TV9 वर बातमी खाल्ली, 'माणिकराव गोव्याच्या ग्रँड हाॅटेलातून पाच आमदार घेऊन फरार, जनता पक्षाला जाऊन मिळाल्याची सूत्रांकडून माहिती...'
~ उल्हास निकम
No comments:
Post a Comment